Type Here to Get Search Results !

लोकांची दुचाकी,चारचाकी गाडी घेण्याची स्वप्ने अरिहंत पतसंस्था करणार पूर्ण





आपल्या दारी एखादी टू व्हीलर अथवा फोर व्हीलर असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु सर्वसामान्यांना आपला घरगाडा ,प्रपंच, मुलांचे शिक्षण यामुळे टू व्हीलर अथवा फोर व्हीलर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. असे चित्र सर्वत्र दिसत आहे.परंतू सध्या अरिहंत अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि.या संस्थेच्या वतीने आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे हेतूने, त्यांना वाहन कर्ज देण्यात येत आहे. नुकतेच या संस्थेच्या माळवाडी शाखेच्या वतीने श्री बाजीराव चौगुले यांना चारचाकी वाहन कर्ज देऊन त्यांचे इनोव्हा क्रिस्टा ही गाडी घेण्याचे स्वप्न साकार केले. त्याचबरोबर प्रमोद गायकवाड राहणार माळवाडी यांचे देखील आधुनिक यामाहा कंपनीची  दुचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे कामी संस्थेने मोलाचा हातभार लावला. या दोन्ही गाड्यांचा चावी प्रदान कार्यक्रम सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी माळवाडी शाखेमध्ये संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शितल किणीकर यांच्या हस्ते दोघांना चाव्या सुपूर्त करण्यात आल्या. आपले अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी संस्थेचे व संस्थापक अध्यक्ष शितल किणीकर यांचे मनापासून आभार मानले.

यावेळी संचालक अनिल किणीकर, विशाल सावळवाडे, मार्केटिंग मॅनेजर प्रवीण गुरव, तसेच ऑफिस कर्मचारी अनुज पाटील, प्राजक्ता चव्हाण, कल्याणी कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे सदस्य, ग्राहक व शुभचिंतक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments