Type Here to Get Search Results !

राजाराम वीर यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

 


पंकज गाडे,भिलवडी

 

भिलवडी दि.२४ 
शैक्षणिक  व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कात्रज येथील राजाराम वीर यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. कृष्णाबाई चुडप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांना त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची दखल घेत देण्यात आला.
राजाराम वीर यांनी अनेक वर्षांपासून शिक्षणप्रसार, विद्यार्थ्यांसाठी सुविधा, तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
या गौरवाबद्दल प्रतिक्रिया देताना राजाराम वीर म्हणाले, “माझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची पावती म्हणून हा पुरस्कार मिळाल्याचे समाधान वाटते. हा सन्मान मला आणि माझ्यासारख्या कार्यरत असलेल्या व्यक्तींना नवी प्रेरणा देणारा आहे.”

Post a Comment

0 Comments