भिलवडी (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे ९८९०३८२०४१
२६ जुलै – कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणात जलसाठा झपाट्याने वाढत असून, धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (शनिवार) सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फूट उघडण्यात आले. या दरवाजांद्वारे १६,५६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.याशिवाय, कोयना धरण पायथ्यावरील विद्युतगृहाची दोन्ही युनिट्स सुरू असून त्यामधून २,१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे एकूण १८,६६५ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कोयना नदीच्या काठी जाऊ नये, तसेच आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.जलसंपदा विभाग आणि प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Post a Comment
0 Comments