पलूस ( सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे
दि.२६ महाराष्ट्र राज्याचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस (साहेब) आणि उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केदार उद्योग समूह, पलूस आणि ज्योती सृष्टी फाउंडेशन, पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत पलूस शहरातील विविध भागांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (वही इत्यादी) तसेच खाऊ वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा - कोयना वसाहत, पद्मनगर, आंबेघर वसाहत, पलूस कॉलनी या ठिकाणी हे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय येसूगडे (भाऊ), भाजपा शहराध्यक्ष पलूस रामानंद पाटील, तसेच हनुमंत मोहिते, विशाल बुचडे (संचालक, केदार अर्बन सोसा), उमेश पाटील, शंकर पवार, गणेश माने, आकाश कदम, मुदने बापू, अनिल पाटील, संकेत येसूगडे, सचिन राडे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात संबंधित शाळांचे आदर्श मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments