पलूस (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे ९८९०३८२०४१
पलूस सहकारी बँकेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साही व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. या वेळी चेअरमन वैभवराव पुदाले यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर करत सांगितले की, बँकेचा एकूण व्यवसाय १०६२ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला असून, बँक सातत्याने ०% एन.पी.ए. राखत आहे. ठेवी ६२० कोटी, तर कर्जवाटप ४४१ कोटींपर्यंत पोहोचले आहे.
बँकेच्या च्या सर्व २७ शाखा आधुनिक तंत्रज्ञानासह कार्यरत असून ग्राहक सेवा, UPI, मोबाईल बँकिंग, लॉकर सुविधा अशा सर्व सोयी पुरवल्या जात आहेत. नवीन शाखांना उत्तम प्रतिसाद लाभत असून, त्या लवकरच नफ्यात येतील, असे पुदाले यांनी सांगितले. वाई शाखेचे कामही अंतिम टप्प्यात असून ती सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू होईल.
सभेच्या प्रारंभी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली वाचन ईश्वर सिसाळ यांनी केले. अहवाल, ताळेबंद वाचून मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी बँकेची कामगिरी सादर केली. बँकेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी माजी उपाध्यक्ष शामराव डाके, बाळासाहेब जगताप, विश्वास पाटील, श्रीकांत लाड, भरतसिंह इनामदार, सुहास पुदाले, गणपतराव पुदाले, अजित कुलकर्णी, विजयसिंह कदम, संजय पवार, शरद शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.बँकेच्या वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढत गणपतराव पुदाले व माजी प्राचार्य डॉ. बी.एन. पवार यांनी शुभेच्छा दिल्या. बँकेने ११% लाभांश दिला असून, ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर ही प्रगती शक्य झाल्याचे वैभवराव पुदाले यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश मुळे यांनी केले व आभार चंद्रकांत गोंदिल यांनी मानले.
Post a Comment
0 Comments