Type Here to Get Search Results !

भिलवडी येथे महापुरात ‘आनंद पोहण्याचा’ उपक्रम उत्साहात....८० जलतरणपटूंचा सहभाग; कृष्णामाई जलतरण ग्रुपतर्फे आयोजन




भिलवडी(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये भिलवडी ता.पलूस येथील कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीने आनंद पोहण्याचा हा उपक्रम राबविला जातो.त्या पार्श्वभूमीवर

 मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ रोजी आनंद पोहोण्याचा हा उपक्रम आमणापूर पूर ते भिलवडी घाट या दरम्यान कृष्णा नदीच्या पाणी पात्रामध्ये संपन्न झाला.यामध्ये भिलवडी येथील तब्बल ८०  जलतरणपटूंनी सहभाग घेवून पोहण्याचा आनंद घेत, पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याची भिलवडी वासियांची परंपरा अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे.



सदर उपक्रमाचे आयोजन कृष्णामाई जलतरण ग्रुपचे अध्यक्ष गजानन चौगुले,  राजाराम येसुगडे , नागनाथ वसगडे, शशिकांत यादव, महेश शेटे, जगदीश माळी, प्रदीप शेटे, सुहास चिंचवडे, डॉ. शशिकांत पाटील, किरण पाटील, नारायण तावदर, सुबोध वाळवेकर, महावीर पाटील, अक्षय पाटील, रणजित पाटील, दिलीप पाटील, कपिल शेटे, कुणाल रांजणे  आदींनी केले होते.कृष्णामाईला श्रीफळ वाहून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.या उपक्रमामध्ये युवकांबरोबरच श्रृती शशिकांत पाटील,श्रावणी सचिन वसगडे,श्रेया सचिन वसगडे या मुलींनी ही सहभाग घेतला होता तसेच प्रणव शशिकांत राजवंत व प्रसन्न शशिकांत राजवंत या दोघांनी प्रथमच



सहभाग घेत महापूर पोहण्याचा अनुभव घेतला.भिलवडी येथील पूर्वीची वयस्कर मंडळी त्यांच्या आठवणी सांगताना आवर्जून सांगतात की, ते भिलवडी येथे  पोहायला सुरूवात करून, अंकलखोप पाणवट्याला जाऊन लागायचे. त्यांच्या स्वागतासाठी अंकलखोपचे नागरिक  कडक चहा,भाजलेली मक्याची कणसे,हरभऱ्याचा हुरडा यासहित शेकोटी पेटवून आतुरतेने उपस्थित असायचे.  हिच परंपरा सध्याच्या युवा पिढीनेही आनंदाने चालू ठेवली आहे.मंगळवारी आमणापूर येथून भिलवडी कृष्णा नदी घाटाकडे पोहण्यासाठी निघालेल्या या जलतरणपटूंनी औदुंबर ते भिलवडी या कृष्णा नदी तीरावरील निसर्गरम्य वातावरणासह महापूर पोहण्याचा आनंद लुटला. यामध्ये अवघे आठ वर्षे असलेल्या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनी हिरीरीने भाग घेऊन, भिलवडी कृष्णा नदी घाटापर्यंतचे अंतर केवळ अर्धा ते पाऊण तासात पार केले. यावेळी या सर्वच जलतरणपटूंच्या चेहऱ्यावर जंग जिंकल्याची भावना दिसून येत होती.दरम्यान महापूर काळातील भिलवडी परिसराचे  देवदूत म्हणून ओळखले जाणारे नितीन गुरव यांनी त्यांच्या यांत्रिक बोटीसह पोहण्याच्या मार्गाबाबत मोलाचे मार्गदर्शन करून, जलतरणपटूंना सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments