आष्टा (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
क्लेरमॉन्ट इंटरनॅशनल स्कूल आष्टामध्ये कारगिल विजय दिवस आणि विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात राष्ट्रभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे उपनिरीक्षक मा. श्री. अतुल आठवले साहेब प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व राष्ट्रगीताने झाली. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारताचे शूर सैनिक आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषण आणि नाट्य सादरीकरण केले. या प्रसंगी ‘कारगिल विजय दिन’ म्हणजे देशभक्तीचा आणि शौर्याचा अमर इतिहास असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी केले.
यानंतर शाळेतील नविन नियुक्त शालेय प्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवनिर्वाचित हेड बॉय ईशान मुल्ला, हेड गर्ल शाहिदा मुल्ला, ब्ल्यू हाऊस कॅप्टन अथर्व चव्हाण, ग्रीन हाऊस कॅप्टन नईम पट्टेकरी, रेड हाऊस कॅप्टन स्वरूप घनवट, येल्लो हाऊस कॅप्टन वेदिका चौगुले आणि विविध समित्यांच्या प्रमुखांना सन्मानपूर्वक फीत लावून जबाबदाऱ्या देण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी देशासाठी कार्य करण्याचा संकल्प करत "जय हिंद, जय भारत" या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या संयुक्त कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांची आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत झाली. पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे संयोजन श्री प्रतीक इंगवले यांनी पाहिले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक मा. राजेश चौगुले, सचिव सौ.शितल चौगुले, उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय सोकाशी, संचालिका सौ. दिपा सोकाशी आणि व्यवस्थापक श्री. विकास सूर्यवंशी, शाळेचे प्राचार्य श्री. चंदनगौडा माळीपाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
Post a Comment
0 Comments