Type Here to Get Search Results !

भिलवडी पोलिसांची मोठी कामगिरी; ५.५० लाखांचे २२ चोरीचे मोबाईल हस्तगत..तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रासह परराज्यातून मोबाईल शोधून मालकांना केले परत


भिलवडी (सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे ९८९०३८२०४१


भिलवडी पोलिस ठाण्याने हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याच्या मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे २२ मोबाईल हँडसेट हस्तगत केले आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे हे मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातून शोधून काढण्यात आले असून संबंधित मालकांना परत करण्यात आले आहेत.
भिलवडी पोलिस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणी तसेच आठवडी बाजार परिसरात नागरिकांचे मोबाईल हरवणे अथवा चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. याबाबत नोंदी झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
या कारवाईत पोलिसांनी विविध ठिकाणांहून २२ मोबाईल हस्तगत केले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी भिलवडी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर , उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलिस शिपाई  धीरज खुडे, संतोष जाधव, सतपाल सावंत, गणेश शिंदे व अजित लिंबळे यांनी सहभाग घेतला.

चौकट - 
नागरिकांनी आपल्या मोबाईलची काळजी
घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात व आठवडी बाजारात मोबाईल सुरक्षित ठेवावा.मोबाईल हरवला अथवा चोरीला गेल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी
   सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे

Post a Comment

0 Comments