भिलवडी(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
सामाजिक जाणीव व सेवाभाव जपण्याच्या उद्देशाने आपले दैवत माजी मंत्री स्व. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त तसेच डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब काका युवा मंचच्या वतीने सावली बेघर निवारा केंद्र, सांगली येथे अन्नदान सेवेचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत सावली बेघर निवारा केंद्रात वास्तव्यास असलेल्या बेघर, निराधार व गरजू नागरिकांना सकस व पौष्टिक अन्नाचे वाटप करण्यात आले. समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या सेवाभावी कार्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला.
यावेळी भिलवडी गावचे नेते बाळासाहेब काका मोहिते, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक माणिकचंद देसाई सर, चोपडेवाडी गावचे नेते रविंद्र बापू यादव, ॲड. रमेश दादा मोहिते, जावेद भैय्या तांबोळी, सुखवाडी गावचे युवा नेते महेश दादा जगताप, गणी मिर्झा चाचा, नांद्रे गावचे सरपंच महावीर अण्णा भोरे, इंद्रजीत मोहिते तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व बाळासाहेब काका युवा मंचचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्व. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला तसेच डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. बाळासाहेब काका युवा मंचच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, भविष्यातही अशा सेवाभावी उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments