Type Here to Get Search Results !

आशियाई रणांगणात सुवर्ण कामगिरी : पोलीस हवालदार अविनाश लाडांची चमकदार झेप


सांगली( सत्यवेध न्यूज )

पंकज गाडे 9890382041



भारतीय संघात निवड होण्याचा मान मिळाल्यानंतर चेन्नई (तामिळनाडू) येथे ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या २३ व्या एशिया मास्टर अॅथलेटिक्स स्पर्धेत सांगली पोलीस दलातील पोलीस हवालदार अविनाश तानाजी लाड (नेमणूक – वाहतूक शाखा, विटा) यांनी सुवर्ण कामगिरीची नोंद करत देशाचे, जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव गौरवले आहे.

३५ प्लस वयोगटातील ४x१०० मीटर रिले शर्यतीत लाड यांनी दमदार धाव घेत भारतीय संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्यांच्या या उल्लेखनीय प्रदर्शनाची क्रीडा क्षेत्रासह पोलीस दलात देखील व्यापक दखल घेतली जात आहे.

या यशामागे पोलीस अधीक्षक मा. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, तसेच सहायक पोलीस निरीक्षक सचिन माळी (वाहतूक शाखा, विटा) यांचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण व कठोर सरावासाठी पोलीस हवालदार अभिजीत फडतरे यांनी विशेष प्रशिक्षण दिल्याचे लाड यांनी सांगितले.

अविनाश लाड यांची आता २०२६ मध्ये दक्षिण कोरिया (डेगू स्टेडियम) येथे होणाऱ्या वर्ल्ड मास्टर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी निवड झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आणखी एक पदक मिळवून देण्याची त्यांची तयारी सुरू आहे.लाड यांच्या या यशामुळे सांगली जिल्हा आणि महाराष्ट्र पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments