Type Here to Get Search Results !

ऊस दराच्या लढ्यासाठी स्वाभिमानी रणांगणात — भिलवडीत वाहतूक रोखली


भिलवडी(सत्यवेध न्यूज)

पंकज गाडे 9890382041


ऊसाला पहिली उचल ३७५१ रुपये तसेच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपये मिळालेच पाहिजे त्याशिवाय वाहने सोडणार नाही अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उसाचा दर जाहीर न करताच ऊस वाहतूक करणारी हुतात्मा सहकारी साखर कारखाना, क्रांती कारखाना, सोनहिरा व दत्त इंडिया सांगली कारखाना या कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारी वाहने भिलवडी येथे रोखून धरण्यात आली.

ऊस दराच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, भिलवडी येथे ऊस वाहतूक वाहने रोखली असून जो पर्यंत ऊस दर जाहीर होत नाही तोपर्यंत ऊस वाहतुकीचे एकही वाहन हलवू दिले जाणार नाही, असा ठाम इशारा संघटनेने दिला आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करूनही ऊस दराबाबत मौन बाळगल्याने संघटनेने तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.

चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल विना कपात प्रतिटन ₹३७५१ मिळाली पाहिजे. गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन ₹२०० चा दुसरा हप्ता तात्काळ मिळाला पाहिजे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.





 संघटनेच्या २४ व्या ऊस परिषदेत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत व संमतीने या मागण्यांचे ठराव करण्यात आले होते.

 जिल्ह्यातील कारखाने सुरू होऊन दोन ते तीन दिवस झाले, तरी सांगली जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडलेली नाही आणि एफआरपी (FRP) दर जाहीर केलेला नाही.

 जोपर्यंत कारखानदार मागण्यांवर ठोस निर्णय घेत नाहीत आणि दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत भिलवडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस वाहतूक पूर्णपणे रोखून धरेल.


शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च आणि साखरेसह उपपदार्थांना मिळालेला चांगला दर लक्षात घेऊन कारखानदारांनी शेतकऱ्यांना योग्य व न्याय दर द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदिप राजोबा यांनी दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे,कार्याध्यक्ष संदीप राजोबा, तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील,मनोहर पाटील, राजू पाटील व उस उत्पादक शेतकरी उपास्थित होते आंदोलनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून

भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





Post a Comment

0 Comments