बोरगाव (ता. तासगाव) — आधार सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, बोरगाव यांच्या वतीने यंदाही ज्ञान, विचार आणि संस्कारांचा दीप प्रज्वलित करणारी ‘आधार व्याख्यानमाला २०२५’ आयोजित करण्यात आली आहे. ही व्याख्यानमाला २५ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होणार असून, प्रतिष्ठित वक्त्यांची उपस्थिती आणि विविध विषयांवरील प्रबोधनात्मक व्याख्याने यांची आकर्षक मेजवानी यात रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हे आधार व्याख्यानमालेचे सातवे वर्ष आहे.
व्याख्यानमालेची सुरुवात शनिवार, दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता होणार आहे. या दिवशी श्री. बाबासाहेब परीट (शिराळा) यांचे “विनोदी कथाकथन” हे व्याख्यान होईल. हे व्याख्यान कै. श्रीपाद जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले आहे.
रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता प्रा. डॉ. सूरज चौगुले (ईश्वरपूर) यांचे “आनंदाच्या दाही दिशा” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होईल. हे व्याख्यान कै. जयपाल डोळ व कै. राजू (शेठ) डोळ यांच्या स्मरणार्थ घेण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेचा समारोप सोमवार, दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.३० वाजता होणाऱ्या ‘आधार साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याने होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सुहास (भैय्या) बाबर, आमदार, खानापूर -आटपाडी विधानसभा मतदारसंघ, असतील. अध्यक्षस्थानी प्रकाशराव उर्फ बाळासाहेब (बापू) पवार तर स्वागताध्यक्ष म्हणून मा. अशोक (तात्या) पाटील, अध्यक्ष, आधार प्रतिष्ठान, बोरगाव हे उपस्थित राहणार आहेत.
ही व्याख्यानमाला आधार प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालय, बोरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथे पार पडणार असून, या प्रबोधनात्मक कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments