पलूस (सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
कृष्णा वेरळा सूतगिरणीने देशात परदेशात नावलौकीक प्राप्त केला आहे सहकारी सूतगिरण्यांसमोर गेल्या काही वर्षांपासून अनेक अडचणी आहेत. बाजारपेठ, वीज बील याबरोबरच ईतर आव्हानांचा सामना सूतगिरण्यांना करावा लागतोय तरीही सूतगिरणीने शिस्तबद्ध व काटेकोरपणे कारभार करुन आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे . असे प्रतिपादन आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी केले पलूस येथील कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार डॉ.कदम मार्गदर्शन करताना बोलत होते.
अध्यक्षस्थानी सूतगिरणीचे अध्यक्ष बी. एस. गोतपागर होते. यावेळी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, जे.के. बापू जाधव,बाळासाहेब पवार,पांडुरंग सुर्यवंशी ,गणपतराव सावंत, सर्जेराव पवार, मारुती चव्हाण, गिरीष गोंदिल, सतपाल साळुंखे,सुधीर जाधव, विश्वास पाटील शरद शिंदे प्रल्हाद शिंताफे , परशुराम शिंदे, , सर्व संचालक, सभासद उपस्थित होते. आमदार डॉ.विश्वजित कदम पुढे म्हणाले, स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी दूरदृष्टी ठेऊन सूतगिरणीची स्थापना केली. सूतगिरण्यांसमोर देशांतर्गत मंदी , महागाई, कापासचे वाढते भाव यामुळे अडचणी आहेत. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून वीज बील व ईतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. याही पुढे प्रयत्न करण्यात येतील. संस्थेत २५ हजार ७२८ चात्या सुरू आहेत. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. बाजारपेठ व विविध अडचणींना तोंड देत अहवाल सालात ९९ कोटी३० लाख रूपयांचे सूत विकले. अहवाल सालात संस्थेला 3 कोटी 23 कोटींचा नफा झाला आहे.
कठीण परिस्थितीत ही कृष्णा वेरळा सूतगिरणीने कै. डॉ पतंगराव कदम यांचे आशीर्वाद व आमदार मोहनराव कदम , डॉ . शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुतगिरणीची प्रगती सुरू ठेवली आहे .समाज कल्याण विभागाकडे कर्जापोटी परतफेड करणाऱ्या काही मोजक्या सुतगिरण्यामध्ये आपले सुतगिरणी अव्वल आहे असे सांगितले . स्वागत अध्यक्ष बाळासाहेब गोतपागर यांनी, अहवाल वाचन जनरल मँनेजर ए. डी.दिवटे यांनी,विषयवाचन आर्थिक व्यवस्थापक अशोक पाटील आभार उपाध्यक्ष वैभव गायकवाड यांनी मानले.सुत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले संयोजन जनरल मॅनेंजर ए डी दिवटे ,अशोक पाटील, सर्व कर्मचारी यांनी केले
Post a Comment
0 Comments