इस्लामपुर(सत्यवेध न्यूज)
पंकज गाडे 9890382041
इस्लामपूर ता. वाळवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त आज १ ऑगस्ट रोजी वाळवा तालुक्यातील सर्व पक्षीय मातंग समाज संघटनांनी एकत्र येत इस्लामपूर तहसिलसमोर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अखेर बसवला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पुतळा व स्मारक उभारणीची रीतसर मागणी करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर समाजबांधवांनी स्वतः पुढाकार घेत ऐतिहासिक निर्णय घेतला.
अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाळवा तालुक्यातील वाटेगाव असूनही आजपर्यंत तालुक्यात त्यांचा पुतळा किंवा स्मारक उभारले गेले नाही, ही शासन व लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने मोठी कसोटी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. पोलिस प्रशासनाकडून पुतळा न हटवण्याबाबत दबाव आणण्यात आला असला, तरी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा कोणत्याही परिस्थितीत हलवू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा दिला आहे.
"जोपर्यंत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कायदेशीर मान्यता देत नाहीत, तोपर्यंत हा पुतळा हटवला जाणार नाही. प्रसंगी रक्त सांडले तरी माघार घेणार नाही," असा इशारा देत या विषयाची तीव्रता अधोरेखित करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक घडामोडीमध्ये मातंग समाजातील डॉ. विजय चांदणे, मा. विकास बल्लाळ, मा. सुधाकर वायदंडे, मा. उत्तम चांदणे, मा. तानाजी साठे, मा. नंदकुमार नांगरे, दयानंद चव्हाण, मा. शंकर महापुरे, प्रा. सुभाष वायदंडे, मा. बापूराव बडेकर, मा. भास्कर चव्हाण, मा. राम देवकुळे, मा. कबीर चव्हाण, मा. सदाभाऊ चांदणे, मा. विनोद बल्लाळ, मा. गॅब्रियल तिवडे, प्रभाकर तांबीरे, अजिंक्य बल्लाळ, रवि बल्लाळ, पिराजी थोरवडे, आकाश खवळे, शशिकांत वायदंडे, हर्षद बल्लाळ, दीपक मिसाळ, श्रद्धा शिंदे, शशिकांत चव्हाण, अजित गायकवाड आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Post a Comment
0 Comments